web counter
Visit Counter
उदगीरात स्वतंत्र वाहतूक शाखेला मंजूरी दया-नगराध्यक्ष बागबंदे
उदगीर- शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा व संवेदनशीलतेचा विचार करुन स्वतंत्र वाहतूक शाखा मंजूर करुन संख्याबळ वाढवावे अशी मागणी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यानी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन मागणी केली. उदगीर शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली असुन येथील नगर पालिका 'अ' दर्जाची आहे. शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त असुन संवेदनशील शहर म्हणून ओळख आहे. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात मुबलक पोलीस कर्मचा-यांची गरज आहे. ठाण्यात मंजुर संख्याबळापेक्षा उपलब्ध संख्याबळ कमी असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्रास होत आहे. शहराची व्याप्ती वाढत असतानाच शहारातून दोन मुख्य राजमार्ग जातात, या राजमार्गावरील वाहतुकीची समस्या बिकट असुन बेशीस्त वाहतुकीमुळे दीर्घकाळ वाहतुकीची कोंडी होत आहे. पुरेसे कर्मचारी नसल्याने उपलब्ध कर्मचा-यांवर ताण पड़त आहे. यामुळे शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा व पुरेसे संख्याबळ मंजुर करावे अशी मागणी नगराध्यक्ष बागबंदे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्षांसमवेत नगरसेवक रामचंद्र मुक्कावार, मनोज पुदाले, श्रीरंग कांबळे, अँड. दत्ताजी पाटील, रेल्वे बोर्डाचे सदस्य मोतीलाल डोइजोडे यांची उपस्थिती होती.
व्यापारी शिष्टमंडळाने घेतली महासंचालकाची भेट- येथील म. गांधी मार्गावरिल व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची भेट घेउन विविध मागण्यांचे निवेदन दिले, व्यापार्याच्या प्रमुख मागणीत भाजी मार्केट परिसरात पोलीस चौकी मंजुर करणे व स्वतंत्र वाहतूक शाखेची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात विकास पत्तेवार, प्रशांत मांगुळकर,रामदास जळकोटे,बंडु हूंडेकरी,गोपाळ मुक्कावार, दत्ता वाकुड़े, विजय मांगुळकर,शशिकांत खंडाळिकर,उदय धुर्वे,सुमित बागबन्दे सह व्यापारी उपस्थित होते.
प्रतिनिधी सतीश गाडेकर
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us