web counter
Visit Counter
पालकमंत्र्यांची खुर्ची विकणे आहे ! शिवसेना करणार निलंग्यात जाहीर लिलाव
लातूर - राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणींच्या गर्तेत सापडल्याचा आरोप करत शिवसेनेने चक्क पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या खुर्चीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ३०० हून आधिक शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत नोंदणी केली आहे. आघाडी सरकारच्या काळात जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विद्यमान पालकमंत्र्यांनी अधिकार्‍याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. मात्र, सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सेनेने केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव कोणी करायचा असा सवाल माजी आमदार अशोक निलंगेकर यांनी जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला होता. त्याला प्रतिसाद देत सेनेच्या अभय साळुंके यांनी खुर्चीचा लिलाव करु असे जाहीर केले होते.
या लिलावात भाग घेण्याकरता १०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत असून त्याच्या रीतसर पावत्या शिवसेनेकडून दिल्या जात आहेत. त्यासाठी मतदारसंघात शेतकरी जागृती अभियान राबविले जात आहेत. २१ डिसेंबरपर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक नावांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट सेनेने ठेवले आहे.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us