web counter
Visit Counter
लातूर-निलंगा मार्गावर एसटी व ट्रकचा भीषण अपघात; ३ ठार, ८ जण गंभीर
लातूर- निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एसटी बस- ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. तर ८ जण जखमी झाले आहेत. अपघातामधील एसटी लातूरहून हैदराबादकडे जात होती. त्यावेळी औसा गावाच्या पुढे चलबुर्गा पाटीजवळ हा अपघात झाला. एसटी व ट्रकच्या धडक होऊन  झालेल्या अपघातामध्ये अंकिता अमित भोज यांच्यासह ३ जण ठार झाले. इतर २ मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. तर अमित भोज, दीपक गुंडेवार नाईक, दीपाली नाईक, गिरीश गुंडेवार नाईक, नागनाथ कलप्पा हंसराळे अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. या सर्व जखमींवर लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा मोठा अपघात आहे. १८ नोव्हेंबर रोजी देखील एसटी आणि ट्रकच्या अपघातात ७ जण ठार झाले होते, तर २६ नोव्हेंबरला कार अपघातात तिघे ठार झाले होते. 
प्रतिनिधी- फयओदीन सराफ 
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us