web counter
Visit Counter
अपंग दिनानिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतिने साहित्य वाटप.
चाकूर- येथील नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र शाखा लातूरच्या वतीने जागतिक अपंगदिनानिमित्त नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांच्या हस्ते १५० अंध विद्यार्थी व विद्यार्थिंना ब्लँकेट व काठ्यांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्यातील लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली या चार जिल्ह्यातील १५० अंध विद्यार्थ्यांचा सहभाग होता.दरवर्षी ही संस्था वेगवेगळ्या तालुक्यात जावून अंध असणाऱ्या विद्यार्थी व अंध कुटुंबांना उपयोगी साहित्याचे वाटप करतात.यावर्षीचे आयोजन चाकूर येथे करण्यात आले होते. यामध्ये अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती आयोध्या केंद्रे यांच्याकडून १५० अंध विद्यार्थ्यांना ब्लँकेट देऊन त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.त्याबरोबरच आमदार विनायकराव पाटील यांच्याकडून या अंध विद्यार्थ्यांना काठ्या देण्याची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले.यामध्ये ३५ महिला अंध व ११५ पुरुष अंध होते त्यात विद्यार्थी,व्यवसायिक,नौकरदार कुंटुब सहभागी होते. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष एम डी वाघमारे,महासचिवएन डी गायकवाड,सचिव प्रल्हाद लोंढे,संदीप चोपडे,कोषाध्यक्ष दत्ता करदुरे,विशाल लोहारे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी- सुशील वाघमारे
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us