web counter
Visit Counter
शेतातील माती आरोग्यदायी बनवा जागतिक मृदादिनानिमित्त धिरज देशमुख यांचे आवाहन
लातूर- आपली धरतीमाता पृथ्वीवर निवास करणा-या लोकांचे अन्न उत्पादन करण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत असते. या धरणीमातेची काळजी करण्याची आज गरज आहे. त्यामुळे प्रत्येक शेतक-यांनी शेतातील मातीला जास्तीत जास्त आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण मातीमध्ये असणा-या घटकावर उत्पादीत होणा-या अन्नधान्यांची पोषकता अवलंबून असते, असे मत लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले. जागतिक मृदादिनानिमित्त मांजरा चॅरीटेबल ट्रस्ट संचलित मांजरा कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व आरसीएफ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरा कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित रब्बी शेतकरी  मेळाव्यात अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा परिषद सदस्य धिरज विलासराव देशमुख बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ञ्यंबक भिसे यांची उपस्थिती होती. तरूण शेतक-यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवावे असे आवाहन करून धिरज विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती पिकवावी,व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन गोष्टींचा अवलंब करावा. मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान सर्व शेतक-यांपर्यंत पोहंचविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला उत्पादन गटातील शेतकरी महिलांचे कर्ज उल्लेखनीय असल्याचे नमुद करून गटांच्या माध्यमातून काळानुरूप शेती उत्पादन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांनी जागतिक मृदादिन हा केंद्रीय कृषी व कल्याण मंत्रालयाच्या वतीने शेतक-यांमध्ये जागृती करण्यासाठी साजरा केला जातो. शेतक-यांनी मांजरा कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या प्रयोगशाळेच्या वितरीत होणा-या जमीन, आरोग्य पत्रीकेनुसार शेती उत्पादन करावे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तंत्रज्ञान विस्ताराचे कार्य जिल्ह्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी आमदार ञ्यंबक भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.एस.एस.डिग्रसे यांनी केले. त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्व विषेद करून मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८४४ गावातील एकूण २ लाख १३ हजार २८८ माती नमुने तपासणी करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजय देशमुख, विद्यमान उपाध्यक्ष गोविंद बोराडे, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, लालासाहेब चव्हाण, बादल शेख, डॉ.व्ही.पी.सुर्यवंशी, रमेश चिल्ले, अभिजित देशमुख, आरसीएफचे विजय कदम, सौ.बांगड, आत्माचे प्रकल्प व्यवस्थापक सी.डी.पाटील, कृषी विकास अधिकारी बी.एस.रणदिवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us