web counter
Visit Counter
चाकूर येथे विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..
चाकूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी समाजबांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 61 व्या महापरिनिर्वाण दिनी वैशाली बौद्ध विहार ,नालंदा बुद्ध विहार, आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, चाकूर येथे सर्व समाजबांधवांच्या वतीने 6 डिसेंबर 2017 बुधवारी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची दीप, धूप व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी पंचशील त्रिसरण ग्रहण करण्यात आले. लहान मुलींनी अभिवादन गीत सादर केले. यावेळी प्रा. भीमराव साळवे, मधुकर कांबळे, महालिंगे केशव, केरबा कांबळे, माधव सूर्यवंशी, एल.डी.किणीकर, ज्ञानोबा मोरे,सुशिल वाघमारे, प्रा.सुभाष मोठेराव, प्रा बालाजी कांबळे, अँड.राजवंश, सह महिला लहान बालके अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. तर चाकूर तालुक्यातील शेळगाव येथे देखील महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले प्रसंगी शिवाजी माने, नंदकिशोर सोनकांबळे, पप्पू सोनकांबळे, सह अन्य महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
सुशिल वाघमारे, चाकूर
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us