web counter
Visit Counter
'कचरा दाखवा, बक्षीस मिळवा' मनपाची घोषणा, महापौरांच्या घराजवळच कचऱ्याचा ढीग
लातूर - मनपाच्या 'कचरा दाखवा, बक्षीस मिळवा' घोषणेनंतर महापौरांच्याच घराजवळ कचऱ्याचे ढीग आणि मोकाट जनावरांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे मनपा कारभाराबाबत दिव्याखाली अंधार ही म्हण तंतोतंत खरी ठरत असल्याचा प्रत्यय लातूरकरांना येत आहे. नुकतेच पंतप्रधानांच्या आवाहनानुसार लातूर मनपा प्रशासनाकडून २ ऑक्टोबरपासून स्वच्छता अभियान सुरू केले गेले. या निमित्ताने शहरातील कचरा उचलण्यासाठी कार्यरत असलेली मात्र आर्थिक बाबीमुळे बंद पडलेली घंटा गाडी भाजप खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी मनपा प्रशासनाकडून लातूरकरांना येत्या २ महिन्यात लातूर शहरातून कचऱ्याचे समूळ उच्चाटन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. त्यावेळी शहरात कचरा दाखवणाऱ्याला मनपाकडून बक्षीस दिले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र घंटा गाडी सुरू करून ४ दिवस होऊनही मनपाचे महापौर सुरेश पवार यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग व मोकाट जनावरे असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे मनपाचे आश्वासन आणि बक्षिसाची घोषणा याविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us