web counter
Visit Counter
रेणापूर मध्यम प्रकल्पात ४३ टक्के पाणीसाठा 
रेणापूर- तालुक्यातील अध्र्या गावांना व बिड जिल्ह्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या भंडारवाडी येथील रेणापूर मध्यम प्रकल्पात पावसाळा संपत आला तरीही केवळ 30 टक्के एवढाच पाणीसाठा जमा झाल्याने या प्रकल्पावर आधारित गावांना पिण्याच्या पाण्याची चिंता सतावत होती. परंतु मंगळवार दि. 10 आक्टोबर रोजी पडलेल्या पावसाने प्रकल्पाची पाणीपातळी वाढली असुन43 टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला असून अजून पाण्याचा येवा चालूच असल्याने पाणीपातळी वाढणार आहे. लातूर शहराला 2015/16 मध्ये पाणीसाठा टंचाई काळात पाणीपुरवठा करणार्या भंडारवाडी येथील रेणापूर मध्यम प्रकल्पात या वर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने या प्रकल्पावर आधारित असणार्या पानगाव दहा खेडी योजना, रेणापूर दहा खेडी पूरक योजना, बिटरगाव पाच खेडी योजना बिड जिल्ह्यातील पट्टीवडगाव सातखेडी योजना अशी एकूण 32 गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात पावसाळा संपत आला तरी केवळ 30 टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us