web counter
Visit Counter
शेतकर्‍यांच्या कष्टाला आमची साथ काल, आज आणि उद्याही-आ.दिलीपरावली देशमुख
रेणापूर- कशीकाळी मागास भाग म्हणुन ओळखल्याजाणार्‍या लातूर जिह्यात सहकाराच्या माध्यमातून कष्टकरी शेतकर्‍यांना योग्य तो न्याय देवून खंबीर साथ देण्याची भुमीका पुर्वीही होती, आज ही आहे व भविष्यात देखील राहील असे आश्वासन देवून शेतीत कसून मेहनत करणार्‍या शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य भाव देवू असे आश्वासन रेणा कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी मंत्री मा.आ.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी दिले. कारखान्याची सन 2016-17 या वर्षाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि.27 सप्टेंबर 2017 रोजी कारखान्यचो चेअरमन मा.श्री.आबासाहेब पाटील याच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आ.श्री.त्र्यबक भिसे, चेअरमन आबासाहेब पाटील,व्हा.चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, व्हा.चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, जिहा बँकेाचे माजी चेअरमन श्री.एस.आर.देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जागृती कारखान्याचे उपायक्ष श्री.लक्ष्मण मोरे, मांजरा कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशैय उटगे, विकास कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.गोविंद बोराडे, रेणापूर बाजार समितीचे सभापती चंद्रचुड चव्हाण, रेणापूर तालूका काँग्रेसचे अध्यक्ष तथा तज्ञ संचालक श्री.लालासाहेब चव्हाण, मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.जितेंद्र रनवरे, विकास कारखान्याचे युनीट 2 चे कार्यकारी संचालक श्री.अभीजीत देशमुख, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक श्री.एच.जे.जाधव, विशेष लेखा परीक्षक श्री.पी.एच.कानवटे साहेब, श्री बिर्ले साहेब विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था (साखर),लातूर, व्हि.एस.आय,पुणे येथील शास्त्रज्ञ श्री.सुरेश माने-पाटील व इतर मान्यवराची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार श्री.दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, रेणा कारखान्याची वाटचाल ही गौरवशाली व सभसदांची मान उंचावणारी राहीली आहे. रेणाच्या वाटचालीमुळे या भागात आर्थिक उन्नतीचे नवे पर्व सुरू होवून विकासाचा हा यज्ञ अखंड सुरू ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून शेतकर्‍यांनी आता आधुनीक शेतीची कास धरणे काळाची गरा बनली असून शेंद्रीय पध्दतीने ऊसाची चागवड करत कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घ्यावे असे अवाहन देखील याप्रसंगी त्यांनी केले. आपल्या मनोगतात आमदार त्र्यंबक भिसे यांनी शासनाच्या शेतकर्‍याप्रती उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त करून सहकार चळवळ मोडीत काढू पाहणार्‍या या सरकाराल मतदारांनी कोणत्याही परिस्थीतीत थारा देवू नये असे अवाहन करून रेणा कारखान्याच्या वाटचालीचा फायदा रेणापूर परिसरातील लाखो शेतकर्‍यांना व्हावा असे त्यांनी त्यांनी सांगीतले. आपल्या अहवाल वाचनात चेअरमन आबासाहेब पाटील यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जिवन कार्यास संदेश मानुन आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणा कारखाना एकदिलाने वाटचाल करत राहील असे आश्वासन शेतकरी सभासदांना दिले. या वार्षीक सर्वसाधारण सभेत कार्यकारी संचालक श्री.बी.व्ही.मोरे यांनी विषय पत्रीकेवरील सर्व विषयाचे वाचन केले त्यास व्हा.चेअरमन श्री.सर्जेराव मोरे यांनी अनुमोदन देवून उपस्थित सभासदांनी टाळ्याच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली.या प्रसंगी सुरेश माने पाटील यांनी ऊस विकास मार्गदर्शन शेतकर्‍यांना केले. कारखान्याच्या सर्व संचालकांनी उपस्थित मान्यवरांचा यथेाचीत सत्कार केला व सदरील वार्षीक सर्वसाधारण सभेस कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, स्नेहलराव देशमुख,  रविकांत आकणगीरे, संग्राम माटेकर, आनंतराव देशमुख, चंद्रकांत सुर्यवंशी, प्रविण पाटील, संभाजी रेडडी, शहाजीराव हाके, तानाजी कांबळे, सौ.वैशाली माने, शिवराज माने, लालासाहेब चव्हाण,धनराज दाताळ, सभासद, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार तसेच कारखान्याचे अधिकारी, खातेप्रमुख व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी कारखान्याचे संचालक मा.श्री.प्रविण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले व शेवटी पसायदान होऊन वार्षीक सर्वसाधारण सभेचा समारोप झाला.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us