web counter
Visit Counter
चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम जेरबंद; नागरिकांकडून चोप
लातूर- सध्या नवरात्र उत्सवानिमित्त भवानी मातेच्या दर्शनास मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरला पायी जात आहेत. असेच आपल्या कुटुंबियांसोबत मातेच्या दर्शनाला निघालेल्या चिमुकलीला एका नराधमाने उचलून नेले. पुढे औसा येथे निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार करताना काही सतर्क लोकांनी त्याला पकडून चोप दिला. एका कुटुंबातील भाविक औसामार्गे तुळजापूरला पायी जात होते. दरम्यान त्यांची ४ वर्षांची मुलगी हरवली होती. मात्र, बुधवारी दुपारी एका ४ वर्षीय बालिकेला एक २२ वर्षीय तरुण उचलून नेत असल्याचे औसा येथील काही नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला असता तो मद्यधुंद असल्याचे निदर्शनास आले. त्या नराधमाने औसा येथील एका महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एका मंदिराशेजारी सदर बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सदर नागरिकांनी आरोपीला पकडले आणि बेदम मारहाण केली. योगेश ताटे असे या नराधमाचे नाव असून, त्यास नागरिकांनी औसा पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या नराधमाला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसानी योगेश ताटे या नराधमाच्या विरोधात विनयभंग आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सदर बालिकेला सुखरूप तिच्या आईकडे सुपूर्द केले.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us