web counter
Visit Counter
कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केलं ट्राफीक कंट्रोल, पोलिसांच्याही गाड्या अडवल्या!
लातूर- महानगरपालिकेनं लातूर शहरात १४ चौकातून नव्याने वह्तूक नियंत्रण करणारी सिग्नल यंत्रणा बसवली, ती चालूही झाली पण कुणीच हे सिग्नल काय सांगतात ते पहायला तयार नाहीत. त्यामुळे ट्राफीकचा ताण तसाच आहे. ‘असून सोय होते गैरसोय’ ही नवी म्हण जन्माला आली आहे. काल आ. अमित देशमुख यांनी याबबतचे पत्र प्रसिद्धीस दिले. सिग्नल चालू करण्याची आणि त्या ठिकाणी पोलिस नेमण्याची सूचना केली. आज सकाळी दहाच्या सुमारास कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पांढरा गणवेष आणि पांढर्‍या टोप्या परिधान करुन गांधी चौकत वाहतूक नियंत्रित केली. वाहतूक नियंत्रित करण्याचे हे आंदोलनच होते. १५ दिवसात व्यवस्था न लागल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करु असा इशारा स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी दिला आहे. गांधी चौकांना जोडणार्‍या चारही रस्त्यांच्या तोंडाला नगरसेवक थांबले होते. वाहतूक पोलिस ज्या पद्धतीने वाहतुकीचे नियमन करतात त्या पद्धतीनेच त्यांनीही रहदारी नियंत्रित केली. हे आंदोलन तासभर सुरु होते. अनेकांना चौकात थांबावे लागल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि संतापही दिसत होता. सिग्नल यंत्रणा बसवून झाल्यानंतर मनपाने ती पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडे वर्ग करायला हवी. त्यानंतर त्या त्या ठिकाणी पोलिस नियुक्त केले जातात आणि यंत्रणा कामी लागते, पण मनपाने हे अद्याप केले नाही. सिग्नल्स बसवण्याची ही योजना कॉंग्रेसच्या काळातली असल्याने ती सुरु झाल्यास आ. अमित देशमुख यांना श्रेय जाईल अशी भिती मनपातील सत्ताधारी भाजपाला वटते असा आरोप गोविंदपूरकर यांनी केला. यावेळी गौरव काथवटे, सचिन मस्के, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, पप्पू देशमुख, सपना किसवे, तबरेज तांबोळी, विजयकुमार साबदे, रविशंकर जाधव, पप्पू देशमुख, इमरान सय्यद, गौरव काथवटे, अयुब मणियार, व्यंकटेश पुरी, सचिन मस्के, युनूस शेख, हमीद बागवान, दत्ता मस्के यांसह काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us