web counter
Visit Counter
किरण लोभेच्या कुटुंबियांना डॉक्टर संघटनेने दिले एक लाख
लातूर- लातूरमधील पहिला अवयवदाता म्हणून ख्यातीकीर्त पावलेल्या आणि तीन जीवांना वाचविण्यासाठी प्रत्यक्ष आपल्या स्वत:च्या मृत्यूला थांबविणाऱ्या स्व. किरण सुनील लोभे या तरुणाच्या कुटुंबियांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या सदस्यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली आणि लोभे कुटुंबियांनी दाखविलेल्या असामान्य धैर्याबद्दल कौतुकोद्गार काढत किरणच्या मातोश्री श्रीमती रेखाताई यांना एक लाखाच्या अर्थसहाय्याचा धनादेश सुपूर्द केला. आयएमएने केवळ सहानुभूतीच्या शब्दांची फुले न उधळता किरणच्या कुटुंबियांना हा कृतीशील सलाम करुन आपल्या घट्ट सामाजिक बांधिलकीचाही प्रत्यय आणून दिला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड यांच्या नेतृत्वाखालील या चमूमध्ये डॉ. अभय कदम (सचिव), डॉ. ओम भोसले, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. दीपक गुगळे, डॉ. डी. एन. चिंते, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. शिवाजी काळगे, डॉ. अजित जगताप, डॉ. भराटे, डॉ. सिद्दीकी आदींचा समावेश होता. 
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us