web counter
Visit Counter
दोन राजकीय गटात हाणामारी; चारचाकी वाहनांची तोडफोड, एसआरपी तैनात
लातूर- पानचिंचोलीत येत्या सात तारखेला ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. एक गट मतदारांना पैसे वाटत आहे असा आरोप करीत या गावातील काही कार्यकर्त्यांनी बाहेरुन आलेल्या गटाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. यात वाहनांच्या काचा फुटल्या. मोठ्या प्रमाणावर हाणामारीही झाली. घटना कळताच निलंग्याहून अधिकार्‍यांसह फौजफाटा दाखल झाला. राखीव पोलिस दलाची तुकडीही पाचारण करण्यात आली. गावातील तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, पोलिसांनी सापडेल त्याला ठोकून काढले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटाच्या मिळून नऊ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. १९ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. गावात जमावबंदी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. ही घटना घडताच गावातील बाजार, दुकाने बंद करण्यात आली. केवळ दवाखाने आणि औषधी दुकाने सुरु आहेत. १० हजार लोकसंख्या असलेल्या पानचिंचोली गावात ४५०० मतदार आहेत. विद्यमान ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. सेनेने याहीवेळी पॅनल उभे केले आहे. त्यांच्या विरोधातील पॅनलला मदत करण्यासाठी बाहेरुन लोक आले होते, त्यांनी पैसे वाटण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला गेला पण पैसे सापडले नाहीत. जनता पॅनल आणि परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली, यात पाचजण जखमी झाले अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून पानचिंचोली गावात तणाव वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us