web counter
Visit Counter
उसाच्या शेतात गांजा लावणाऱ्या एका शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक 
लातूर- बेवनाळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथे उसाच्या शेतात गांजा लावणाऱ्या एका शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यात पोलिसांनी ५९ हजार रुपयांची २९.५ किलो वजनाची १४ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. बेवनाळ येथे एका उसाच्या शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी बेवनाळ येथे जाऊन हनमंत नरसिंग मेढे (वय ५२) याच्या गटनंबर १३९ मधील उसाच्या शेतात छापा टाकला. यात ५९ हजार रुपयांची २९.५ किलो वजनाची १४ गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास मलवाडे, राजाभाऊ सूर्यवंशी, अंगद कोतवाड, बालाजी मस्के, खर्रम काझी, बालाजी जाधव, विनोद चिलमे, नामदेव पाटील, दंतराव यांनी पुढाकार घेतला.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us