web counter
Visit Counter
लातूर जिल्हा हागणदारीमुक्त, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांनी केला सत्कार
लातूर- जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याबद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते त्यासाठी परिश्रम घेणार्‍या अधिकार्‍यांचा  मंत्रालयात सत्कार करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,उपसचिव रुचेश जयवंशी, सतिश उमरीकर, संवाद सल्लागार कुमार खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील प्रशासनाने हागणदारी मुक्तीसाठी उत्तम काम केले आहे. परंतु यावरच न थांबता आपण अजून पुढे काम करायला हवे. यापुढे बेसलाईन सर्वेच्या पुढे जाऊन शौचालय बांधण्याचे काम करावे. जिल्हा हागणदारी मुक्त झाल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते. यासाठी दक्ष राहून अधिक काम करणे आवश्यक आहे. लोकांनी शौचालयाचा  वापर करावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. कीर्तनकार, सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. त्यांच्या मदतीने समाजात प्रबोधन करावे. महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार उर्वरित जिल्ह्यातही काम सुरु आहे. इतर जिल्ह्यानीही उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले. याच कार्यक्रमात हागणदारी मुक्त झाल्याबद्दल चंद्रपुर जिल्हयातील अधिकार्‍यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  डॉ.विपीन इटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी पुरी, बाळासाहेब शेलार, गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, तुकाराम भालके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रकाश म्हैत्रे, संवादतज्ञ उध्दव फड,मुल्यमापन सल्लागार संजय मोरे, सचिन वडवले, लेखाधिकारी विशाल बंडे, शालेय स्वच्छता सल्लागार चांगदेव डोपे, हनुमत मुरुडकर, एस.ए.बनकर, टी.डी बिराजदार,मिरकलकर यांचे बबनराव लोणीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यापूर्वी लातूर जिल्ह्यात शौचालये केवळ ११ टक्के होती. प्रशासनाने आता जवळपास १०० टक्क्यापर्यंत काम करुन लातूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे काम केले आहे. हे काम कौतूकास्पद आहे. राज्याला मार्गदर्शक ठरेल असे जाणीव जागृती उपक्रम राबविले आहेत.नेहमीच नाविन्यपुर्ण उपक्रमात लातूर कायम अग्रेसर राहीले आहे. शौचालय असून जे लोक याचा वापर करत नाहीत अशा लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही लोणीकर यांनी यावेळी दिल्या. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ विपीन इटनकर  यांनी आपला जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी केलेल्या कामगिरीचा व कशा प्रकारे योजना राबविली याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक माध्यम सल्लागार कुमार खेडकर यांनी केले. तर आभार संचालक सतिश उमरीकर यांनी केले. या यशाबद्दल जि.प.चे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी सर्व अधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.विविध कामात जिल्हा परिषदेने आपला ठसा उमटवला असून यापुढेही सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत असे मत जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केले. 
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2018 MahaLive News - All rights reserved.
*बीड- माजलगाव येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला..*सोलापूर- मोहोळ दरोडेखोर हल्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल..*अमरावती- मोर्शी नजीकच्या सालबर्डी येथील माडू नदीच्या हत्तीडोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, बुधवारी सकाळी घडली दुर्घटना
24 x 7
News & Entertainment
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF