web counter
Visit Counter
यात्रा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पशु, अश्व प्रदर्शनाचे आयोजन
लातूर- श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानच्या ६५ व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग, लातूर जिल्हा नियोजन व विकास समिती आणि यात्रा समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. १६) सिद्धेश्वर मंदिर परिसरात पशु, पक्षी व अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देवणी, लाल कंधारी व संकरीत जातीच्या सर्वोत्कृष्ट गोवंशीय पशुधनाचा सहभाग राहणार आहे. शिवाय म्हैस वर्गीय, कुक्कुटपक्षी, उस्मानाबादी शेळी व अश्व वर्गीय पशुधनाचा प्रामुख्याने समावेश होणार आहे. तसेच पशुसंवर्धन विषयक महत्त्वाच्या बाबींविषयी माहितीपूर्ण स्टॉल उभारण्यात येणार आहेत. पशुधनाची विविध गटांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व ग्रेडनुसार अ, ब, क, ड अशाप्रकारे बक्षीस वाटप करण्यात येणार आहे. 
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2018 MahaLive News - All rights reserved.
*बीड- माजलगाव येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला..*सोलापूर- मोहोळ दरोडेखोर हल्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल..*अमरावती- मोर्शी नजीकच्या सालबर्डी येथील माडू नदीच्या हत्तीडोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, बुधवारी सकाळी घडली दुर्घटना
24 x 7
News & Entertainment
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF