web counter
Visit Counter
आपदग्रस्त शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई दया-मा. धिरज देशमुख
लातूर- लातूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व वादळी वा-यासह गारपिट झाली. त्यात शेतक-यांच्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहु, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष, केळी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. ते पूर्ण करून आपदग्रस्त शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखलील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना बुधवारी निवेदन दिले. अवकाळी पाऊस व वादळी वा-यासह गारपिटीने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नैसर्गीक आपत्तीने शेतक-यांचा आर्थिक कणा मोडला आहे. शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीसह लातूर तालुक्यात काही ठिकाणी वीज पडून पशुधनही दगावले आहे. ज्वारी, गहु, ऊस आदी पिके भुईसपाट झाली आहेत. हरभरा जमीनदोस्त झाला आहे तर द्राक्ष, डाळींबासह इतर फळबागांची हानी झाली आहे. आंब्याचा मोहोर गळून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी पिकांची हानी झाल्याने शेतकरी पूर्णत: उध्दवस्त झला आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. हे पंचनामे पीकविम्याला पुरक ठरतील, असे असावेत व लातूर तालुक्यासह जिल्हृयातील शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. लातूर लोकसभा युवक काँग्रसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना सदर निवेदन दिले. त्या शिष्टमंडळात लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.व्यंकट बेद्रे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडीले, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, डॉ.दिनेश नवगीरे, लक्ष्मण गणपतराव मोरे, सहदेव मस्के, शंकरराव पाटील, विलास भालके, बालाजी वाघमारे, धिरज झांबरे, सत्तार शेख, प्रशांत गरड, भिमाशंकर शेटे, जयराम जोगदंड, चंद्रकांत टेकाळे, शिवा ढगे, बबन ढगे, प्रदीप राठोड, व्यंकट सुरवसे, अमोल गाडे, बादल शेख, राजेसाहेब सवई, विनोद माने, गंगणे, सुंदर पाटील कव्हेकर, जयचंद भिसे यांचा समावेश आहे.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2018 MahaLive News - All rights reserved.
*बीड- माजलगाव येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला..*सोलापूर- मोहोळ दरोडेखोर हल्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल..*अमरावती- मोर्शी नजीकच्या सालबर्डी येथील माडू नदीच्या हत्तीडोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, बुधवारी सकाळी घडली दुर्घटना
24 x 7
News & Entertainment
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF