web counter
Visit Counter
सिध्देश्‍वर मंदिरात १००१ महिलांकडून रुद्रपठण 
लातूर- ग्रामदैवत श्री. सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर मंदिरात गुरुवारी १००१ महिलांनी रुद्रपठण करुन श्री. सिध्देश्‍वरास अभिषेक केला. मागील १८ वर्षापासून हा उपक्रम सुरु असून शहर व परिसरातील महिलांनी श्रध्देने यात सहभाग घेतला. श्री. सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानचा यात्रा महोत्सव महाशिवरात्री पासून सुरु आहे. या दरम्यान विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमासह पशुप्रदर्शन व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२२) रुद्रपठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २००० सालापासून शहरातील १००१ महिला श्री. सिध्देश्‍वरास सामुहिक रुद्रपठण करुन अभिषेक करतात. अनेक ठिकाणी पुरुष रुद्रपठण करुन अभिषेक करतात परंतू श्री. सिध्देश्‍वर मंदिरात महिला रुद्रपठण करुन अभिषेक करतात. राज्यात कोठेही असा प्रकार आढळत नाही. सौ. शुभदा रेड्डी, सौ. सुखदा मांडे यांच्या पुढाकारातून व देवस्थान विश्‍वस्त मंडळाच्या सहकार्याने हा उप्रकम राबवला जातो. पुणे येथे महिलांकडून सामुहिक अथर्वशीर्ष पठण केले जाते. त्याच धर्तीवर लातूर येथे हा उपक्रम महिलांच्या पुढाकारातून राबविला जातो.गुरुवारी सकाळी ११ वाजता रुद्रपठणास प्रारंभ झाला. अभिषेकानंतर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. रुद्रपठणामुळे मंदिर व परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. या रुद्रपठणात सौ. सरोजनी पाटणकर, सौ. स्मिताताई गोजमगुंडे यांच्यासह  १००१ महिला सहभागी झाल्या होत्या.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2018 MahaLive News - All rights reserved.
*श्रीदेवींवर आज मुंबईत अंत्यसंस्कार, आज पार्थिव मुंबईत आणण्यात येणार, विशेष विमानाने येणार पार्थिव..*राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याबद्दल माफी मागतो, दोषींवर कारवाई होणार:मुख्यमंत्री

24 x 7
News & Entertainment
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF