web counter
Visit Counter
*श्रीदेवींवर आज मुंबईत अंत्यसंस्कार, आज पार्थिव मुंबईत आणण्यात येणार, विशेष विमानाने येणार पार्थिव..*राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याबद्दल माफी मागतो, दोषींवर कारवाई होणार:मुख्यमंत्री

24 x 7
News & Entertainment
लातूर- सध्या मोठ्या शहरांतील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावर आपल्या प्रभागातील कचरा आपल्याच प्रभागात कुजवून त्याची खतनिर्मिती करणे हाच उपाय सध्यातरी दिसत आहे. मराठवाड्यातील पहिला यशस्वी प्रयोग लातूरच्या प्रभाग पाचमध्ये काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केला आहे. यासाठी तीस पीट तयार करण्यात आले असून दररोज पाच हजार कुटुंबीयांच्या तीन टन कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. प्रभाग पाचमध्ये पाच हजार कुटुंबीय आहेत. या प्रभागात कचरा गोळा सविस्तर>>
लातूर- ग्रामदैवत श्री. सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर मंदिरात गुरुवारी १००१ महिलांनी रुद्रपठण करुन श्री. सिध्देश्‍वरास अभिषेक केला. मागील १८ वर्षापासून हा उपक्रम सुरु असून शहर व परिसरातील महिलांनी श्रध्देने यात सहभाग घेतला. श्री. सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानचा यात्रा महोत्सव महाशिवरात्री पासून सुरु आहे. या दरम्यान विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमासह पशुप्रदर्शन व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२२) रुद्रपठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २००० सालापासून सविस्तर>>
लातूर- शिवमहोत्सव समिती व अक्का फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर साकारण्यात आलेली अडीच एकरवरील छत्रपती शिवाजी महाराजांची विश्वविक्रमी रांगोळी पूर्ण झालेली असून, ही रांगोळी पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. यावर्षीची शिवजयंती आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरी करून लातूरचा नावलौकिक जगभरात व्हावा याकरिता शिवमहोत्सव समिती व अक्का फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून जगातील सर्वात मोठी रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची सविस्तर>>
मुंबई- महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले राज्य आहे तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुंतवणुकीचे एक प्रमुख कारण हे येथील कुशल कामगार हे देखील असून इज ऑफ डूइंग र्लीळपशी ही संकल्पना राबवीत असताना वाढणार्‍या उद्योग व्यवसायासोबत याचा कणा असणार्‍या कामगार ह्या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच असंघटीत कामगार, इतर क्षेत्रातील कामगार व सर्व प्रकारच्या अस्थापानांसाठी पाळवयाच्या सुरक्षा व आरोग्य बाबतच्या कायदेशीर प्रावधानांचा अंतर्भाव करणार असल्याचे सुतोवाच कामगार सविस्तर>
लातूर- काँग्रेस पक्षाचे जुने पदाधिकारी व लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान यांना तब्बल चार वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला असून त्यांची नाजूक झालेली प्रकृती आणि त्यांची यापूर्वीची वैद्यकीय पार्श्वभूमी लक्षात घेत त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जामीन मिळाल्यानंतर पुणे येथेच थांबून वैद्यकीय उपचार घेण्याची अट न्यायालयाने त्यांना घातली आहे. चौहान यांना मागील तीन वर्षांपूर्वी काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी बलात्कार व खून प्रकरणी अटक करण्यात आली होती सविस्तर>
लातूर- गत 20 वर्षापासून धाडस ग्रुपच्या वतीने लातुरात विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. गणेश उत्सवासोबत विविध उत्सव या ग्रुपच्या माध्यातून पारंपारिक पध्दतीने साजरे करण्यात येतात. गत आठ वर्षापासून शिवजयंतीनिमित्त धाडस ढोलपथक लातुरकरांसमोर नाविन्यपूर्ण कला सादर करते. या कलेचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी दरवर्षी सिनेतारके लातुरात येतात. याही वर्षी फँड्री फेम प्रसिध्द मराठी अभिनेत्री राजेश्‍वरी खरात सोमवारी लातुरात दाखल होणार आहे. या प्रसंगी धाडस सविस्तर>
लातूर- लातूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व वादळी वा-यासह गारपिट झाली. त्यात शेतक-यांच्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहु, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष, केळी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. ते पूर्ण करून आपदग्रस्त शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखलील सविस्तर>
लातूर- श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानच्या ६५ व्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग, लातूर जिल्हा नियोजन व विकास समिती आणि यात्रा समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. १६) सिद्धेश्वर मंदिर परिसरात पशु, पक्षी व अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देवणी, लाल कंधारी व संकरीत जातीच्या सर्वोत्कृष्ट गोवंशीय पशुधनाचा सहभाग राहणार आहे. शिवाय म्हैस वर्गीय, कुक्कुटपक्षी, उस्मानाबादी शेळी व अश्व वर्गीय पशुधनाचा प्रामुख्याने समावेश होणार सविस्तर>>
लातूर- जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याबद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते त्यासाठी परिश्रम घेणार्‍या अधिकार्‍यांचा  मंत्रालयात सत्कार करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,उपसचिव रुचेश जयवंशी, सतिश उमरीकर, संवाद सल्लागार कुमार खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील प्रशासनाने हागणदारी मुक्तीसाठी उत्तम काम केले आहे. परंतु यावरच सविस्तर>>
लातूर- येथील पोद्दार हॉस्पिटल व पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबीरात 114 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आल्या. या शिबीराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अशोक पोद्दार, मेडीकल कॉन्सील ऑफ इंडियाचे संचालक तथा सीपीएस मुंबईचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, शिलवंत ढवळे, डॉ. चेतन सविस्तर>>
लातूर- लातूर-मुंबई रेल्वेच्या बलिदानातून येऊ घातलेली लातूर-यशवंतपूर रेल्वे आज सुरु झाली. दुपारी एक वाजता आपल्या स्थानकात येऊन थांबलेल्या या गाडीला पालकमंत्री संभाजी पाटील, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाचे स्थानिक नेतेही उपस्थित होते. गाडीच्या इंजिनवर पुढच्या बाजुला भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा या नावाने फलक लावला होता. त्यावर केंद्रातील वरिष्ठ नेते, पालकमंत्री पाटील, खा. गायकवाड सविस्तर>>
अहमदपूर- एका पलायन केलेल्या प्रेमी युगुलाला पकडून आणून चिलखा ग्रामस्थांनी त्यांचा विवाह लावून दिला. हा विवाह दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास बरडमाळ, सोरा (ता. अहमदपूर) येथील महादेव मंदिरात लावण्यात आला. चिलखा येथील शुभम माधवराव होळकर व नवकुंड झरी (ता. चाकूर) येथील अंजली रामदास सुरवसे या प्रेमीयुगुलाने पलायन केले. या प्रेमी युगुलाला सामाजिक कार्यकर्ते अनंत होळकर यांनी उदगीर येथून पकडून आणून सदरील मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्याचा सविस्तर>>