web counter
Visit Counter
जागतिक एड्स दिनानिमित्त काढलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी- जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक जिल्हा रुग्णालय परभणी यांच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता जिल्हा रुग्णालयात महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शेख अकबर शेख जाफर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जावेद अथर, डॉ. प्रकाश डाके यांची  प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जावेद अथर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन जागतिक एड्स दिनाचे महत्व, संकल्पना, रुपरेषा व उद्देश सविस्तरपणे विषद केले. तसेच ऐच्छीक रक्त तपासणी व समुपदेशन केंद्रातील सुविधा आणि पालकांकडून बालकास होणारे एचआयव्ही संक्रमण, नियंत्रण कार्यक्रम, एआरटी सेंटर, रक्तपेढी, लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प इत्यादीची माहिती रॅलीतील उपस्थितांना दिली. शासकीय परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य फारुखी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र लोलगे यांनी जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य शून्य गाठावयाचा आहे. म्हणजेच यापुढे नवीन एचआयव्ही संसर्ग होऊ द्यायचा नाही, कलंक व भेदभाव शुन्यावर आणने तसेच एड्सने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आणने हा उद्दिष्टपूर्ण कार्यक्रम वैयक्तिक, सामाजिक आणि सरकारी पातळीवर सतत जागृत राहून राबविल्यास उद्दिष्टपूर्ती होऊ शकते असे त्यांनी सांगितले. रॅलीत, संयोजन समितीचे पदाधिकारी, विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र  यांनी सहभाग घेतला.
प्रतिनिधी- लक्समन कदम 
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us