web counter
Visit Counter
बीड जिल्ह्यात वीज पडून सहा जण ठार
बीड- वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यानंतर वीज पडून बीड जिल्ह्यात दोन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी (दि.7) सायंकाळी  घडली. चारदरी (ता. धारुर) येथे वीज पडून पाच जण ठार झाले. तर दुसरी घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव जवळ घडली. चारदरी येथील घटनेत सहा जण जखमी झाले.  हे सर्व शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास बाजरीचे पीक काढण्यासाठी गेले होते. चारदरीच्या शिवारातील  घागरवाडयाच्या महाळ शिवारातील  बाह्याच्या झाडाखाली पाऊस आल्यानंतर थाबले होते. त्यावेळी झाडावर वीज पडून आसाराम रघुनाथ आघाव (२८), उषा आसाराम आघाव (२५), दिपाली मच्छींद्र घोळवे (२१), शिवशाला विठल मुंडे (२1), वैशाली संतोष मुंडे (२५) हे पाच जण मृत झाले आहेत. तर सुमन भगवान तिडके (४५), रुक्मीन बाबासाहेब घोळवे (५२), कुसाबाई नामदेव घोळवे (४५), सिताबाई दादासाहेब घोळवेग (२५), सुरेखा आबासाहेब आघाव (१७)  हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 प्रतिनिधी- राहुल हाकाळे
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us