web counter
Visit Counter
भाजपच्या काळात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या-शरद पवार
मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आतामहत्यांचा आलेख वाढला असल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. पक्षाच्या "वकील सेल'च्या बैठकीत ते बोलत होते. आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या होत होत्या, मात्र त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमच्या सरकारने ठोस प्रयत्न केले. मात्र भाजप सरकार हे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले असून, सरकारची अनास्था शेतकरी आत्महत्या वाढण्यास कारणीभूत आहे, अशी टीका पवार यांनी केली. आमच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा आम्ही त्याची कारणमीमांसा केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससारख्या संस्थांकडून अहवाल मागवले. त्यात कर्जबाजारीपणा हे कारण समोर आल्यावर पीककर्ज 12 टक्‍क्‍यांवरून 3 टक्‍क्‍यांवर आणले. 70 हजार कोटींची कर्जमाफी केली. तेही कोणतेही फॉर्म भरून न घेता. शेतीमालाला भाव दिला तेव्हा कुठे आत्महत्यांची संख्या कमी झाली. आज ती संख्या पुन्हा वाढत आहे, याबद्दल पवार यांनी खंत व्यक्त केली. 
वकिलांनी पुढे यावे- तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांचे मूलभूत अधिकार नोटिसा पाठवून दाबले जात आहेत. दलित व स्त्रियांवर अत्याचार वाढायला लागले आहेत. सावकारी कर्जाच्या जाळ्यात शेतकरी अडकला आहे. सावकार विरोधी कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. लोकांचे खरे प्रश्न तालुका पातळीवर असतात. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "लीगल सेल'ने सामान्यांची लूट थांबविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. 
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us