web counter
Visit Counter
उसाचा ट्रक पलटून वृध्‍द पती-पत्‍नी जागीच ठार
उसाचा ट्रक अंगावर पलटल्‍याने वृध्‍द दाम्‍पत्‍य जागीच ठार झाल्‍याची दुर्देवी घटना घडली आहे. हा अपघात देवळाली नजीकच्या चादंणे वस्तीवरील पुलाजवळ आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला. साहेबराव चादंणे (वय ६५), मिराबाई साहेबराव चादंणे (वय ६०, दोघेही रा. चादंणे वस्ती देवळाली तालुका करमाळा) अशी मृत्‍यू झालेल्‍यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, वाशींबे येथून ऊस घेऊन निघालेला ट्रक हा देवीचा माळ येथील कमलाभवानी कारखान्याकडे निघाला होता. देवळाली नजीक चादंणे वस्तीनजीकच्या पुलाजवळ हा ट्रक आला. रस्त्याच्या नित्कृष्ट व चढ उतार असणा-या पुलावर ट्रक आला असता अचानक ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यावेळी रस्त्याच्या खाली शेवरीच्या झाडाचा पाला कढणार्‍या वृध्द दाम्‍पत्याच्या अंगावर ट्रक कोसळला. यात हे दाम्‍पत्य जागीच ठार झाले. जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोलिस उपनिरिक्षक गणेश शिंदे, देवळालीचे रहिवाशी व पंचायत समितीचे उपसभापती गहिनीनाथ ननवरे यांनी मदतकार्य केले. विशेष म्‍हणजे, अतिधोकादायक अपघाती ठिकाण ठेवलेल्या सुप्रीम कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी करमाळा तालुका पत्रकार संघातर्फे याच ठिकाणी आंदोलन केले होते.
प्रतिनिधी-सोलापूर
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us