web counter
Visit Counter
कर्जमाफीसाठी राज्यभरातून 77 लाख अर्ज
मुंबई- राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी आतापर्यंत 77 लाख 26 हजार अर्ज आले आहेत, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. जवळपास 56 लाख शेतकरी कुटुंबांनी हे अर्ज केले आहेत. राज्य सरकारने 34,022 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. दरम्यान कर्जमाफीसाठी 77 लाख अर्ज आले असले, तरी अजून 2 लाख 41 हजार 428 शेतकऱ्यांनी अद्याप आधार नंबर दिलेला नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही, त्यांनी पडताळणीसाठी तात्पुरतं आधार नोंदणी नंबर पुरवावा, असं आवाहन सहकार विभागाने केलं आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना या अंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक होतं. दरम्यान, कर्जमाफीबाबत आढावा घेण्यासाठी सुभाष देशमुख यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीत कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us