web counter
Visit Counter
टोमॅटो अवघा २ रुपये किलो; ग्राहक खुश, पण लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत
नाशिक- निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी  कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड येथील बाजार समित्यांमध्ये २ ते ४ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने, टोमॅटो उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मंगळवारी सुमारे ५ हजार  कॅरेट टॉमेटोंची आवक झाली. प्रतिकॅरेटला ४0 ते ८१ रुपयांपर्यंत (२0 किलोचे एक कॅरेट) भाव मिळाला. अत्यंत कमी भाव  मिळाल्याने, लागवडीचा खर्चही  निघत नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. देशातील विविध राज्यांमध्ये वाढते उत्पादन व खरेदीदार राज्यांची गरज भागवून, शिल्लक राहिलेल्यामुळे टोमॅटोचे भाव घसरले असून, उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही कालावधीपूर्वी टोमॅटो उत्पादन करणार्‍या राज्यांमध्ये  हवामानाचा फटका बसल्याने, महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोंची मागणी वाढली होती. मोठा आकार, प्रतवारी, दर्जा टिकवणक्षमता अशी वैशिष्ट्ये असलेल्या टोमॅटोंना ५0 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला होता. त्यामुळे उत्पादकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. मात्न, सध्या परिस्थिती बदलली आहे. गुजरात राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर टॉमेटो उत्पादन सुरू असल्याची माहिती व्यापारी व निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली. गुजरातमधून शेकडो ट्रक टॉमेटो दिल्ली येथे जातो. आंध्र प्रदेश,  तामिळनाडू या राज्यांमध्ये कर्नाटक येथून टॉमेटो जातो, तर छत्तीसगड या राज्यातून ओरिसा, भुवनेश्‍वर या ठिकाणी टोमॅटो विक्रीसाठी जातो. राजस्थान  भागातील टोमॅटो  स्थानिक गरजपूर्तीनंतर गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या काही भागांमध्ये पाठविण्यात येतो. त्यामुळे पूर्वी ज्या राज्यामध्ये टोमॅटोची मोठय़ा प्रमाणावर मागणी होती, त्या राज्यांमध्ये टोमॅटो  उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने महाराष्ट्रातील भाव घसरल्याची माहिती उंबरे यांनी दिली. लातूर भागातही लक्षणीय उत्पादन असल्याने नाशिक जिल्ह्यातील उत्पादकांना सॉस तयार करणार्‍या, तसेच मुंबई भागातील ग्राहक असे पर्याय उरले आहेत. सॉस तयार करणार्‍या कंपन्या २ रु पयांपासून टोमॅटो खरेदी करतात. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दह्याणे, दिंडोरी तालुक्यातील उमराळे व कोराटे, तसेच जळगाव जिल्ह्यातील कंपन्यांचा यात समावेश आहे. सॉस तयार करणार्‍या कंपन्या खरेदीदार असल्याने, तेवढी तरी दिलासादायक बाब उत्पादकांसाठी आहे. दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा व उपबाजारात थोड्या-फार फरकाने टोमॅटो खरेदी करणारे व्यापारी मुंबई, कल्याण याबरोबर गुजरात राज्यातील दिव-दमण या केंद्रशासित भागात टॉमेटो पाठवितात. मात्न, अपेक्षित फायदा होत नाही, तसेच बहुतांशी कमी दरात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान सोसण्याची तयारी ठेवावी लागते, अशी स्थिती आहे. यामुळे याचा एकत्रित परिणाम भाव घसरण्यावर झाल्याने उत्पादक धास्तावले आहेत. सॉस कंपन्यांकडून टॉमेटोंची खरेदी गुजरात राज्यातही टॉमेटो विक्रीसाठी जातो आहे. सॉस बनविणार्‍या कंपन्यांनाही सध्याची स्थिती टॉमेटो खरेदीसाठी अनुकूल असल्याने, आडत्यांच्या माध्यमातून अशा कंपन्या मोठय़ा प्रमाणावर टॉमेटो खरेदी करीत आहेत. 
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2018 MahaLive News - All rights reserved.
*बीड- माजलगाव येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला..*सोलापूर- मोहोळ दरोडेखोर हल्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल..*अमरावती- मोर्शी नजीकच्या सालबर्डी येथील माडू नदीच्या हत्तीडोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, बुधवारी सकाळी घडली दुर्घटना
24 x 7
News & Entertainment
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF