web counter
Visit Counter
सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी आक्रमक , ५ मार्चला अधिवेशनावर मोर्चा
मुंबई- सातव्या वेतन आयोगासाठी आक्रमक पवित्रा घेत, आॅल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉइज फेडरेशनने ५ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. या वेळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवरही धडक मोर्चे काढून निवेदन देण्यात येणार आहेत. फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आझाद मैदानावर दुपारी २ वाजता हजारो शासकीय कर्मचारी धडक देतील. या वेळी धरणे आंदोलनाने सातवा वेतन आयोग, वाढीव महागाई भत्ता, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल, तर दुपारी १ वाजता राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर जिल्हास्तरीय पदाधिकारी निवेदन घेऊन धडकतील. शासनातील मागासवर्गीय कर्मचा-यांच्या मागण्यांवरही आंदोलनातून आवाज उठविणार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले. त्यात आरक्षण कायद्याप्रमाणे मागासवर्गीय कर्मचा-यांच्या नेमणुका करण्याचे आवाहन शासनाला केले आहे. शिवाय कायद्याची अंमलबजावणी न करणाºया संबंधित अधिका-यांवरील कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2018 MahaLive News - All rights reserved.
*श्रीदेवींवर आज मुंबईत अंत्यसंस्कार, आज पार्थिव मुंबईत आणण्यात येणार, विशेष विमानाने येणार पार्थिव..*राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याबद्दल माफी मागतो, दोषींवर कारवाई होणार:मुख्यमंत्री

24 x 7
News & Entertainment
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF