web counter
Visit Counter
तुंगत (ता.मोहोळ) येथील नातेवाईकाच्या तिसऱ्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी निघालेल्या माय-लेकराचा मोटारसायकल व अनोळखी वाहनाच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी सहा वाजता मोहोळ-पंढरपूर राज्य मार्गावरील पेनूर (ता.मोहोळ) शिवारात झाला. प्रविण उर्फ पप्पू सर्जेराव पाटील व अविदा सर्जेराव पाटील (रा.पाटील वस्ती,पापरी,ता.मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. आज सकाळी ही दोघे माय-लेकरे तुंगत येथील नातेवाईकाच्या तिसऱ्या दिवशीच्या धार्मिक विधीसाठी मोटार सविस्तर>>
बुलडाणा- एका शेतकऱ्याकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने दुय्यम निबंधक नितिन खाकरे याला रंगेहात पकडले आहे. मोताळा तालुक्यातील वारुळी गावातील गट क्रमांक ५४ मधील वडिलोपार्जित शेतजमिनीतील वारसांचे नाव कमी करण्यासाठी दुय्यम निबंधकाने शेतकऱ्याकडे पैशांची मागणी केली होती. शेतकऱ्याने मोताळा येथील दुय्यम निबंधक नितिन खाकरे यांच्याकडे अर्ज केला होता. सातबारातील नाव कमी करण्यासाठी दुय्यम निबंधक नितिन खाकरे यानी तक्राकर्त्यांला सविस्तर>>
परभणी- जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक जिल्हा रुग्णालय परभणी यांच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता जिल्हा रुग्णालयात महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शेख अकबर शेख जाफर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जावेद अथर, डॉ. प्रकाश डाके यांची  प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा सविस्तर>>
उसाचा ट्रक अंगावर पलटल्‍याने वृध्‍द दाम्‍पत्‍य जागीच ठार झाल्‍याची दुर्देवी घटना घडली आहे. हा अपघात देवळाली नजीकच्या चादंणे वस्तीवरील पुलाजवळ आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला. साहेबराव चादंणे (वय ६५), मिराबाई साहेबराव चादंणे (वय ६०, दोघेही रा. चादंणे वस्ती देवळाली तालुका करमाळा) अशी मृत्‍यू झालेल्‍यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, वाशींबे येथून ऊस घेऊन निघालेला ट्रक हा देवीचा माळ येथील कमलाभवानी कारखान्याकडे निघाला होता सविस्तर>>
सोलापूर- चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज पहाटे ही दुर्देवी घटना घडली.संगमेश माळगे, दीपक घुमडेल आणि अक्षय आसबे अशी या तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापूरजवळील तळे हिप्परगाजवळ आर्किड महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत होते. ते तिघेही शनिवारी रात्री ग्रंथालयात अभ्यासासाठी गेले होते सविस्तर>>
बीड- गेवराई राष्ट्रीय महामार्ग २११ च्या रांजनी गावाजवळ मोटारसायकल व अॅपेरिक्षा यांची समोरासमोर जोराची धडक लागल्याने चार जण गंभीररित्या जखमी झाली असल्याची घटना घडली. दादासाहेब मिसाळ वय ५० वर्ष राहणार महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना, राम गिरी वय ४५ वर्ष राहणार बीड, लखन ठोंबरे वय ४५ वर्ष राहणार माळापुरी, तालुका गेवराई जिल्हा बीड, विलास धुताडमल वय ३५ वर्ष राहणार माळापुरी तालुका गेवराई जिल्हा बीड असे या अपघातात जखमी सविस्तर>>
मुंबई- राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवर 20 टक्के आणि वटाण्यावर 50 टक्के आयात शुल्क लागू केले आहे, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिली. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी गव्हावर दहा टक्के आणि मटारवर शून्य टक्के आयातशुल्क होते. राज्यमंत्री खोत पुढे म्हणाले, जगभरातून देशात आयात होत असलेल्या धान्यावर आयात शुल्क वाढवण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. मुख्यमंत्री सविस्तर>>
नांदेड- महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील विराजमान झाले आहेत. काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवारांचा तब्बल ६८ मतांनी विजय झाला. शीला भवरे आणि विनय गिरडे पाटील या दोघांना प्रत्येकी ७४ मते मिळाली. अपक्ष नगरसेवकानेदेखील काँग्रेसला मतदान केले. सेनेचा नगरसेवक तटस्थ राहिला. दरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी खासदार अशोक चव्हाण पालिकेत आले. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची सविस्तर>>